सोलापूर : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 मधील कलम 29 अन्वये बाल कल्याण समिती गठीत करण्यात येते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2002 कलम 13 मध्ये नमूद केलेल्या तरतूदीनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेकडून बाल कल्याण समिती सदस्यांचे नियुक्ती करीता नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
     अर्जदाराची वैयक्तिक माहिती, सदस्यांना बाल मानसशास्त्र व बाल कल्याणचे विशेष ज्ञान असणे आवश्यक मानसशास्त्र, गुन्हेगारीशास्त्र, समाजकार्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गृहविज्ञान शास्त्र, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, महिलांविषयक अभ्यास, ग्रामविकास, इ. पैकी समाजविज्ञानाच्या कोणत्याही एका विषयातील किंवा विधी वा औषधशास्त्र यातील पदवी धारण केलेली असावी, समितीचे सदस्य यांना बालकांशी संबंधीत असणा-या कायदा, आरोग्य, शिक्षण किंवा मुलांशी संबंधित इतर पुनर्वसन व विकास कार्याच्या क्षेत्रातल निदान तीन वर्षाचा अनुभव असावा, समिती नामनिर्देशित करावयाचे सदस्यांवर कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल नसावा, समिती सदस्यांच्या दत्तक विषयक सेवांच्या पदयोजनांत कोणताही थेट संपर्क नसावा, पोलीस विभागाचे चारित्र्य् प्रमाणपत्र, समितीच्या सदस्यांचे वय नियुक्तीवेळी 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा अधिक नसावे, नोकरी करत असल्यास संबंधित कार्यालय प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र, अर्जदार व्यक्तीचे संमतीपत्र, विद्यमान सदस्य दोन वेळा बाल कल्याण समितीवर नियुक्तीस पात्र असतील अशी वर नमुद केलेली कागदपत्रे जोडून नामांकन प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165, अ, रेल्वे लाईन, सुरवसे टॉवर्स, 4 था मजला, सोलापूर या पत्त्यावर पाठवावे.
 
Top