सोलापूर :- सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावाने स्त्री शक्ती पाच पुरस्कार देण्यात येतात यासाठी इच्छुक व्यक्तींनी पंधरा दिवसात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. छत्तीस लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
      तरी सदर पुरस्कार इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 3 प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर कार्यालयाकडे 15 दिवसाच्या आत सादर करावे. त्यानंतर येणा-या प्रस्तावांचा पुरस्काराकरीता विचार केला जाणार नाही. अधिक महितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165, A, सुरवसे टॉवर्स, 4 था मजला, अलबाळ हॉस्पिटलच्या बाजुला, सोलापूर फोन क्र. 0217- 2310671 येथे संपर्क साधावा.
 
Top