पांगरी (गणेश गोडसे) :- जो माणुस आपल्या गावाची ओळख विसरतो तो स्वता:चीही ओळख विसरतो. आजच्या खेडयांची अवस्था ही दिर्घकालीन खेडयांसारखीच झालेली असुन स्वताच्या घराप्रमाणे आपल्या गावाकडेही बघणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजेंद्र दास यांनी केले.
    पांगरी (ता. बार्शी) येथील निलकंठेश्‍वर मंदिराच्या सभामंडपात पांगरी परिसरातील रहिवाशी असणारे व सध्या देश-विदेशात विखुरलेल्या तरूण-तरूणींनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. दास हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सेवा मंडळ पांगरीचे सचिव शशिकांत नारकर होते. यावेळी मुख्याध्यापक बालाजी कोकाटे, माजी सरपंच तात्या बोधे, प्रदेश महिला क्रॉंग्रेस कमिटीच्या सदस्या रूपाली नारकर, शितल जानराव, वित्त व लेखा अधिकारी डॉ.वैभव राऊत, औरंगाबादचे उद्योगपती राहुल मोगले, म्हाडाचे विभागीय वरिष्ठ अधिकारी सुनिल ननवरे, वनअधिकारी रामदास घावटे यांच्यासह देशपरदेशामधुन डॉक्टर, वकिल, इंजिनिअर स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते.
    प्रा.दास पुढे बोलताना म्हणाले की, देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटुन गेला असला तरी आजही खेडयांची अवस्था ही पुर्वीप्रमाणेच आहे. त्यांच्या समस्या, प्रश्‍न हे आजही कायम असुन येथील लोकांना अन्न, पाणी, निवारा, आरोग्यसेवा हया मिळवण्‍यासाठी आजही धडपड करावी लागते़. खेडी संपत चालली असुन स्थलांतरे वाढु लागली असुन त्याचाही तान शहरीकरणावर पडु लागला आहे. गावासाठी कांहीतरी करून दाखवण्‍याची वेळ प्रत्येक सुजाण नागरिकांवर आली असुन ती पार पाडणे काळाची गरज असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
    प्रास्ताविकात रूपाली नारकर यांनी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कौशल्य दाखवुन स्वताःला परिपुर्ण बनवण्‍याचा प्रयत्न केला तसाच गावाचे आपण कांहीतरी देणे लागतो हया विचाराने कांहीतरी विधायक करून दाखवायची तयारी ठेऊन त्यादृष्टीने तात्काळ पावले उचलावीत, असे सांगितले.
     शितल जानराव बोलताना म्‍हणाल्‍या, गडया आपला गांव बरा असे सांगत गाव गावातील माणस यांच्यासाठी कांहीतरी करण्‍यासाठी तरूणांनी पुढे येण्‍याची गरज असल्याचे सांगुन आगामी काळात गावातील होतकरू तरूण, सुशिक्षीत बेकार व गरजवंत विद्यार्थांसाठी भरीव काम करण्‍यासाठी पाऊल उचलण्‍याचा मानस यावेळी बोलुन दाखवला.
    दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात विचारमंथनातुन चांगले विचार समोर आले व ते विचार कृतीत कसे आणता येतील याबाबत विचारविनिमय करण्‍यात आला. राज्यशासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त उदय पाटील यांच्या बोलक्या बाहुल्यांचा मनोरंजक कार्यक्रम पार पडला. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी निलकंठेश्‍वर मंदिर परिसरात चिंच, जांभुळ आदी वृक्षांचे वृक्षारोपन करून ते वृक्ष जगवण्‍याचा निर्धार करण्‍यात आला. यावेळी तृप्ती नारकर, डॉ. आरीफ शेख, राहुल वासकर, धनंजय तौर, विशाल गरड, आनंद मोरे, शेरअली शेख, महेश बोधे, विकास राऊत, शाम शिकेतोड, प्रतिक नारकर, नशिर पठाण, राहुल गायकवाड, अमित देशपांडे, वाहिद शेख, संजय वाकडे, गजानन आरोळे, पत्रकार गणेश गोडसे यांच्यासह पांगरी परिसरातील अनेक गावामधील तरूण, तरूणी उपस्थित होते.
 
Top