पंढरपूर : जैनवाडी (ता. पंढरपूर) या गावला अमेरीका येथील पेटा संस्थेच्या अध्यक्षा इनग्रीड न्यूक्रीक यांनी भेट दिली. पेटा या संस्थेमार्फत औषधोपचार तातडीने केले जातात. यामध्ये किरकोळ आजारापासूनते मोठे मोठे अँपरेशनचा सर्व खर्च पेटा या संस्थेमार्फत केला जातो.
     या संस्थेला अभिप्रेत असल्याप्रमाणे कष्टकरी जनावरांची सर्व प्रकारची काळजी व देखभाल येथील पशुपालनाकडून घेतली जात आहे. याची पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले.
      या प्रसंगी उपस्थित पशूपालकांना मार्गदर्शन करून गावाचा सर्वागिण विकास व कष्टकरी प्राण्यांबद्दल असणारे प्रेम याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांचा सत्कार जैनवाडीचे सरपंच दिपक पवार यांनी केला. याप्रसंगी गावातर्फे मनोगत व्यक्त करताना जागृती निर्मान करण्याचे अश्वासन दिले. यावेळी इंग्लंडच्या पेटा सेस्थेच्या संचालिका मीमी भारताच्या पेटा, संस्थेच्या प्रमुख पुर्वा, जोशी आयपीईएन या प्राणीमित्र संघटनेचे संचालक नाईजल ओटर, डॉ. राकेश चिंतोडा, डॉ. शिशिकर भारतवाज, डॉ. जितेंद्र कुरूदंवाडे, डॉ. गणेश धोत्रे, डॉ. अशोक लोखंडे, जैनवाडीचे सरपंच दिपक पवार, ग्रामसेवक हणमंत खवळे, गणेश जमदाडे, हिम्मत हसूरे, राजकुमार जमदाडे, महादेव लिंगडे, दादा गोफणे, सत्यवान पवार, सुहास पवार, पवण माने, अभिमान गोफणे यांच्यासह बहूसंख्य पशुपालक शेतकरी उपस्थित होते.
 
Top