ढोकी : कोंबडवाडी (ता. उस्मानाबाद) येथील 55 वर्षीय शेतमजुराचा मळणी यंत्रात डोके अडकून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 13 नोव्‍हेंबर दुपारी घडली.
    कोंबडवाडी येथील अलकाबाई सोकांडे यांच्या शेतामध्ये सोयाबीनची मळणी सुरू होती. या मळणी यंत्रावर शेतमजूर गणपती निवृत्ती भोईटे हे रोजंदारीवर काम करीत होते. काम करत असताना गळ्यातील गमजा मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकल्याने भोईटे यांचे डोके मळणी यंत्रात गेले. त्यांचे शरीर डोक्यापासून वेगळे झाले. ही वार्ता गावात पसरल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
Top