बार्शी  : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार्‍या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.१९ पासून सुरु होत असून बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन नाट्यगृहात दि.१९ ते ३० पर्यंत स्पर्धा होत असल्याची माहिती समन्वयक रामचंद्र इकारे यांनी दिली.
    राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व संशोधनाकरिता मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृककला व चित्रपट या कलांना समृध्द आणि सक्षम बनविण्यासाठी तसेच कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण करुन सन्‍मान देण्याचे बहुमोल कार्य केले जाते. मकाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत गावपातळीपासून शहरांपर्यंतच्या सर्व स्तरातील विविध कलांची शिबीरे, महोत्सव, स्पर्धा इत्‍यादी सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. मराठी नाट्य, बालनाट्य, संगीत, संस्कृत, हिंदी व व्यावसायीक नाट्य स्पर्धा इतक्या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही जगातील अभूतपूर्व गौरवसंपन्न स्पर्धा आहे. यंदा हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथङ्किक फेरी १९ विविध केंद्रांवर आयोजित केली आहे. यचङ्कध्ये एकूण २७८ नाट्य संस्थांचा सहभाग आहे.
   
     दि. १९ नोव्हेंबर पासून सोलापूर केंद्रात या स्पर्धेची सुरुवात होत आहे. बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात प्राथमिक फेरीचे आयोजित केले आहे. गतवर्षीपासून नवीन नाट्य संहितांना अधिकचे पाच गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नवीन नाटककार, नवीन संहिता, नवीन रंगशिल्प, नवीन रंगभाषा मराठी रंगभूमीवर प्रयोगशील होईल हा त्यामागचा हेतू आहे. मागील काही वर्षांपासून नाट्यप्रयोगानंतर नाट्यसंस्थेतील लेखक, दिग्दर्शक, कलावंत, परीक्षक यांच्या चर्चेचे आयोजन करण्यात येत आहे. ज्याङ्कुळे विविध केंद्रांवरील कलावंतांची रंगभूमीची समज वृध्दींगत होण्यास मदत होत आहे. दर्जेदार कलावंत व कलाकृती रंगीभूमीवर घडण्यासाठी बक्षिसांच्या संख्येतही भरघोस वाढ करण्यात आली आहे. ५३ व्या वर्षी होत असलेल्या पदार्पणात युवा कलावंतांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नजीकच्या केंद्रावर आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरीता व कलावंतांना प्रोत्साहन करण्याकरीता मराठी नाटकांच्या गौरवशाली परंपरेस सक्षम व समृध्द करण्यासाठी महा संस्कृतीच्या महोत्सवात प्रेक्षकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.
    स्पर्धा यशस्वीतेसाठी नागेश अक्कलकोटे, स्पर्धा समन्वयक रामचंद्र इकारे, सह समन्‍वयक प्रताप दराडे, व्यवस्‍थापक अभिजीत मनगिरे, प्रविण भडके, कृष्णा उपळकर, रुपेश बंगाळे, मकसूद मुल्ला, हर्षद लोहार, गणेश अक्कलकोटे, परमेश्वर चांदणे, वशिम शेख आदि परिश्रम घेत आहे.
 
Top