पांगरी : पांगरी (ता. बार्शी) येथील एका शेळीने चक्क पाच पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे परिसरात पाच पिल्यांच्या शेळीचा विषय कुतुहलाचा झाला आहे. शेळी व पिल्लास पाहण्यासाठी बार्शी तालुक्यासह परिसरातून शेळी-मेंढपाळासह शेतक-यांनी एकच गर्दी केली होती. तालुक्यात पहिल्यांदाच शेळीने पाच पिल्यांना जन्म दिल्यामुळे परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे.
अंकुश सुरेश निंबाळकर (रा. पांगरी) या शेतक-यांने आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीसह शेळीपालन व्यवसाय करीत आहे. त्याच्याकडे असलेल्या साध्या पध्दतीच्या तीन वर्ष वयाच्या शेळीने प्रथमच पाच पिल्लांना सुस्थितीत जन्म दिला आहे. यापुर्वी सदर शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. रंगाने काळी असलेल्या व तिस-या येताच्या वेळेस मात्र सदर शेळीने पाच पिल्लांना जन्म देऊन शेतक-यांने केलेल्या सांभाळाचे पांग फेडले आहेत. शेतक-यालाही अचानक मिळालेल्या या लाभामुळे आनंद झाला आहे. पांगरीत तर प्रथम एवढया मोठया प्रमाणात पिल्ली देण्याचा सदर शेळीने विक्रमच केला आहे. पाच पिल्ली झाल्यावेळेस सदर शेतक-याच्या चेह-यावर आनंद ओसंडुन वाहत होता.
(गणेश गोडसे)
(गणेश गोडसे)