कळंब : येथिल फटाका दुकानदारास तहसिलदारानी कारणे दाखवा नोटीस दिल्याने व्यापा-यात खळबळ उडाली आहे.दिपावालीचे औचित्य साधुन उघडण्यात आलेल्या कळंब शहरातील 30 फटाका दुकानाची तपासणी केली असता ब-याच त्रुटी आढळून आल्याने तहसिलदार शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
कळंब येथील न.प.शाळेच्या प्रागंणामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तीस व्यापा-यांनी आपापली फटाक्याची दुकाने लावण्यात आली आहेत. या सर्व दुकानांची तहसिलदार डी.एम.शिंदे, दंडनिय अधिकारी एम.जी.शिंदे यांनी या दुकानाची तपासणी केली. यामध्ये दुकानात अग्निशम बंब ठेवलेला नाही. दुकानासमोर आग रोधक(वाळू, माती, पाणी) इ. बाबींचा साठा ठेवलेला नाही. खरेदीच्या पावत्या सादर केलेल्या नाहीत. फटाका दुकानाचा परवाना तपासणी वेळी सादर केलेला नाही आदी तपासणीच्या वेळी त्रुटी आढळून आल्याने या सर्व व्यापा-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आलेली आहे.
अनाधिकृत या सर्व बाबींची पुर्तता न केल्यास स्फोटक पदार्थ बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत स्फोटक पदार्थ विक्री केल्याप्रकरणी दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा ही या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे.
आजच करण्याचे आदेश व्यापा-यांनी तात्काळ अग्निशमन बंब ठेवावा, दुकानासमोर आग रोधक साठा ठेवावा, खरेदीच्या मुळ पावत्या द्याव्यात, फटाकेसह विक्रीचा परवाना तात्काळ द्यावा असे आदेश दिले आहेत.