उमरगा (लक्ष्‍मण पवार) : परमार्थ सोपा वाटत असला तरी तो सहज साध्य होणार नाही, यासाठी भक्ताच्या तपस्येत उच्च कोटीची श्रध्दा, निष्ठा, कुवत असावी लागते आणि ही साधना शुध्द भावनेने, त्यागी वृत्तीने असलेखेरीज भगवंत भेटणार नाही, असे विचार ह.भ.प शरदचंद्र बिराजदार महाराज जकेकुरकर यांनी मांडले.
    गुंजेटीवाडी (ता. उमरगा) येथे हनुमान मंदिरात अध्यात्म वारकरी अखंड हरिनाम त्रयोदिन सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात भक्ताना बिराजदार महाराज मार्गदर्शन करीत होते. त्रयोदिन महोत्सवात ग्रामदैवत मारुती देवाची पुजा, अखंड  विना उभारणी, कलश पताका, गाथा पुजन, भजन,प्रवचन, हरिजागर, अखंड जप यज्ञ, उत्हासात संपन्न झाले. ह.भ.प. भिम गुरुजी मुळज, हरिचंद्र लवटे महाराज अचलबेट देवस्थान, शरदचंद्र बिराजदार महराज आदिनी किर्तन केले.
    त्रयोदिन महोत्सव यशस्वी करण्यासाठी ह.भ.प दशरथ देवकते, काशिनाथ पाटील, माधव माशाळे, रावसाहेब लवटे, श्रीमंत यमगर, संत्राम माशाळे,मोतीराम यमगर, अंकुश माशाळे, संजय यमगर,विश्वनाथ खरात,मोतीराम बंडगर, पांडुरंग देवकते,पंडित माशाळे,भैरु पाटील, विश्वनाथ माशाळे,निवृत्ती मदने, सिध्दाप्पा मदने, केशव मदने, मारुती लवटे, विठठल माशाळे, दयानंद होगले, प्रेमनाथ पाटील, शेषेराव माशाळे, प्रकाश पांढरे, श्रीरंग मदने, सुभाष शिरगिरे, संजय रावते, देवराव बरगली, बाबु शेंडगे,बरगली माशाळे,लक्ष्मण शेंडगे,संदीप पांचाळ ,डॉ.चव्हाण अळंगा, ह.भ.प. सौ.सोजराबाई मदने,सौ.गोजराबाई शेंडगे,सौ.नंदा माशाळे, जिजाबाई माशाळे,सरुबाई शिरगिरे,सायाबाई माशाळे,गुंडाबाई यमगर, आदिसह देवकते परिवार व गुंजोटीवाडी ग्रामस्थानी पुढाकार घेतला .

 
Top