बार्शी :- ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, पोतराजा बंदी, स्त्रीभृण हत्या विरोध, न.पा. कर्मचार्‍यांनी विविध वेशभूषा परिधान करुन जनजागृतीचे संदेश देत शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढली.
    महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जवाहर हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. 29 नोव्‍हेंबर सकाळी अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास नगराध्यक्ष कादर तांबोळी यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, जिल्ह्याचे स्वच्छता दूत प्रा. मधुकर डोईफोडे, आरोग्य सभापती अरुणा परांजपे, नगरसेवक देविदास (मुन्ना) शेटे, आरोग्याधिकारी विजय गोदापुरे, प्रशासनाधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्‍याधिकारी पवन म्हेत्रे, आरोग्य निरीक्षक बाळासाहेब गुंड, नागेश लामतुरे आदीजण उपस्थित होते.
     बाळासाहेब गुंड, दिपक काकडे, विवेक गजशिव, सोङ्कनाथ झोंबाडे यांच्या नियोजनात सदरची रॅली नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, सुमित फॅसिलिटीझचे कर्मचारी यांना बरोबर घेऊन, मॉडेल हायस्कूल, शिवाजी महाराज शाळा क्र.१, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र.७, डॉ.झाकिर हुसेन शाळा क्र.१२, भगवान महावीर शाळा क्र.२, शाहिर अमर शेख उर्दू शाळा क्र.११, राजमाता जिजाऊ शाळा क्र.९ इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी झाडे लावा-झाडे जगवा, स्वच्छ दर बार्शी, उघड्यावर शौचास बसू नका, पाण्याचा वापर काटकसरीने करा, गटारांमध्ये कचरा टाकू नका, प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळा असा संदेश देणारे फलक व घोषणा देण्यात आल्या.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता पवार, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब बगाडे, योगेश लोंढे, शाम सोनवणे, अमित निकम, प्रताप गुंड, आबा आगलावे, संजय अवघडे, सूर्यकांत (आण्णा) लोंढे, शामलाल कसबे, गणेश वाघमारे, दिपक मोरे, बाबा वाघमारे, सचिन वाघमारे, विजय वाघमारे, धनंजय गायकवाड, प्रशांत बोकेफोडे, संजय पवार, विशाल बगाडे, पांडुरंग मोरे, देविदास झांझुर्टे, विश्वनाथ शिंदे, अमोल थोरात, त्रिंबक रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top