नळदुर्ग : गुत्‍तेदारीच्‍या कामात तोटा झाल्‍याने एका युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची घटना गुरुवार दि. 14 नोव्‍हेंबर रोजी दुपारी एक वाजण्‍याच्‍या सुमारास किलज (ता. तुळजापूर) येथे घडली.
    सिकंदर देवराव गायकवाड (वय 25 वर्षे, रा. किलज, ता. तुळजापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍याचे नाव आहे. यातील सिंकदर गायकवाड याने गुत्‍तेदारीच्‍या कामात तोटा झाल्‍यामुळे मनस्‍ताप होऊन त्‍याने राहत्‍या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. गौतम भगवान गवळी यांनी पोलिसांत खबर दिल्‍यावरुन नळदुर्ग पोलिसात आकस्‍मात मृत्‍यू म्‍हणून नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास हवालदार सोनवणे हे करीत आहेत.
 
Top