![]() |
| कै. शंकर चव्हाण |
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते कै.शंकर (आप्पा) चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि.12 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात मोफत कर्करोग निदान, उपचार शिबीर, ज्येष्ठ नागरीक व निराधार लाभार्थी मार्गदर्शन मेळावा यासह दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती विक्रांत गरड यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे दिली आहे.
मंगळवारी रोजी पार पडणा-या विविध कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांच्या शुभहस्ते होणार आहे. पापनस बालसदन चोराखळीचे संस्थापक अध्यक्ष वसंत गरड अध्यक्षस्थानी असणार आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बार्शी तालुकाअध्यक्ष विजय ठोंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, बार्शी शहर युवकाध्यक्ष मनिश चौहान, सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडे, नंदकुमार काशिद, कमलाकर पाटील यांच्यासह नर्गिस दत्त मेमोरीयल कॅन्सर हॉस्पीटलचे चेअरमन डॉ.बी.एम.नेने यांच्यासह नामवंत डॉक्टर यावेळी उपस्थित रहाणार आहेत.
मंगळवारी सकाळी मोफत कर्करोग निदान शिबीराने कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व निराधार लाभार्थांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, संजय गांधी निराधार योजना यासह शासनाच्या इतर योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना देऊन मोफत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे गरजेचे आहे. तरी मोफत कर्करोग शिबीराचा व निराधार मेळाव्याचा तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम तरूण मंडळ व कै.आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान पांगरीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
(गणेश गोडसे)