उस्मानाबाद :- तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारासमोर झालेल्या चेंगराचेंगरीवेळी शिरनांदगी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील जनार्धन गणपत जानकर हे गंभीर जखमी झाले होते. सोलापूर येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे ते मयत झाले. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्याबाबत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालयास विनंती करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.