पंढरपूर :- राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. विठ्ठला! राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव तसेच राज्यावर भूकंप, दुष्काळाचे संकट येऊ देऊ नकोस. असे साकडे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी श्री.विठ्ठल चरणी घातले.
कार्तिकी एकादशी निमित्त श्रीविठ्ठल, रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मंदीर समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ना.सोपल बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी, आ.दिपक साळुंखे-पाटील, आ.सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील, मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, माजी आ. उल्हास पवार, जिल्हाधिकारी प्रविण गेडाम, कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, आदी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली येथील वारकरी तुकाराम हरी पाटील, (वय 64) व जयश्री तुकाराम पाटील, (वय 55) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाल्याबद्दल मंदीर समितीच्या वतीने संपूर्ण वर्षभर मोफत प्रवास करण्याबाबत एस.टी.चा पास श्री डांगे यांच्या हस्ते पाटील दापत्यांला प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मंदीर समितीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, प्रा.जयंत भंडारे, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक राजेश प्रधान, अप्पर पोलिस अधिक्षक तुषार दोशी,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, तहसीलदार सचिन डोंगरे, मंदीर समितीचे व्यवस्थापक एस.एस.विभूते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.