परंडा -: एका नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना भूम तालुक्यातील ईडा येथे गुरुवार दि. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यास उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा परंडा तालुक्यातील भांडगावनजीक मृत्यू झाला.
मिराबाई उमेश भोरे (वय 20 वर्षे, ईडा, ता. भूम) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. यातील मिराबाई हिने गुरुवार रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध केले. सदर विवाहितेस चक्कर आल्याने बेशुद्धावस्थेत उपचारासाठी नेत असताना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भांडगावनजीक तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अगतराव भोरे यांनी दिलेल्या माहितीवरुन परंडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पारवे पाटील हे करीत आहेत. दरम्यान, मीराबाई भोरे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.