केज : आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या प्रथम चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ आज दि. 10 नोव्‍हेंबर रोजी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्‍ह्याचे पालकमंत्री जयदत्तजी क्षिरसागर, सुरेश धस तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.धनंजय मुंडे, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.प्रकाश सोळंके, आ. पृथ्वीराज साठे, आ.बदामराव पंडीत, रमेशजी कदम तसेच ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.महादेव बोराडे उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, न.प.तील गटनेते प्रा. श्रीधर भवर, कृ.उ.बा.समितीचे संचालक प्रा.बाळकृष्ण भवर यांनी केले आहे.
 
Top