उस्मानाबाद : घरासमोर खेळत असताना हौदात पडल्याने पाण्यात बुडुन एका तिन वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिंगोली येथे घडली.
शिंगोली येथे राहणारे नारायण शेळके यांचा तिन वर्षाचा मुलगा पृथ्वीराज हा आज दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी आपल्या घरासमोर खेळत होता. खेळामध्ये मग्न असताना तो घराशेजारी असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ गेला व खेळता खेळता पाण्याच्या हौदात पडला. यावेळी त्याच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. घरच्या लोकांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याला डॉ. लामतुरे यांनी मृत घोषित केले.
याबाबत शहर पोलीसात पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ कदम हे करीत आहेत.