महिलांचे एचआयव्ही मधील वाढते प्रमाण खरोखरच चिंताजनक आहे. त्यातही प्रजननक्षम वयोगटातील (18 ते 25 वर्षे) महिलांचे प्रमाण एकूणच गंभीर आहे. महाराष्ट्रातील गरोदर मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण 2004 मध्ये 0.88% होत ते 2009 मध्ये 0.63 % पर्यंत खाली आले.
        गर्भवती महिलांच्या शरीरात एचआयव्हीचा शिरकाव असल्यास अशा 100 पैकी ढोबळ मानाने 30 बालकांना एच.आय.व्ही. संसर्ग सहजपणे होऊ शकतो. हा संसर्ग होण्याच्रे प्रमाण सुमारे 25 % ते 30% आहे. गर्भवती महिलेकडून बाळाला एच.आय.व्ही. संसर्ग होण्याची शक्यता ही पुढील गोष्टींवर अवलंबून असते.
      एचआयव्ही संसंर्गित मातेच्या गर्भात बाळ असताना आतमध्ये काही इजा झाल्यास 3 बाळांना हा संसर्क होऊ शकतो. बाळंत होत असताना नाजुक त्वचेस इजा होऊन किंवा रक्ताचा  व बाळाचा संबंध येऊन 21 बाळांना व स्तनपानादरम्यान 6 बाळांना.
सर्व गर्भवती महिलांना एचआयव्ही बाबत माहिती मिळणे आवश्यक आहे तसेच योग्य प्रकारच्या समुपदेशनानंतर अशा स्वत:ची एचआयव्ही बाबत सद्यस्थिती कळविणेसाठी रक्तचाचणी करुन घेण्याची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पीपीटीसीटी कार्यक्रमांतर्गत शासनाने सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका दवाखाने आणि ग्रामीण भागातील सर्व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात एचआयव्ही तपासणीची सोय मोफत उपलब्ध केली आहे.
        एचआयव्ही संसर्गित माते पासून तिच्या बाळाला HIV चा संसर्ग  होवु नये म्हणुन महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्थेमार्फत जिल्हास्तरावर व ग्रामीण रुग्णालय मध्ये पीपीटीसीटी हा कार्यक्रम राबविला जातो.

सध्या चालु असलेला पालकांकडून मुलांना होणा-या एचआयव्हीच्या संसर्गाचा प्रतिबंध कार्यक्रम -
गर्भधारणे दरम्यान एचआयव्हीच्या प्रसाराला प्रतिबंध करणे यासाठी पालकांना त्यांच्या स्वत:च्या एचआयव्ही संसर्गाबद्दल महिती असेल आणि त्यांनी पीपीटीसीटी कार्यक्रमात उपलब्ध केलेल्या प्रतिबंधाच्या मार्गाचा अवलंब केला तर बाळाला होणा-या संसर्गापासून वाचविणे शक्य होईल म्हणून प्रत्येक गर्भवती महिलेचे समुपदेशन करणे आणि तपासणी करणे महत्वाचे आहे.
      जर महिला एचआयव्ही संसर्गीत असेल तर कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब करुन गर्भधारणा टाळणे, जर एचआयव्ही संसर्गीत महिलेने गर्भधारणा स्वीकारली तर गर्भधारणे दरम्यान तिला प्रॉफीलॅक्सीस उपचार देणे यामध्ये बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यास नेव्हॅरीपीन हे औषध दिले जाते. व बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर त्या बाळास NVP Syrup देण्यात येते. (200 मि.ग्रॅम एकत्र मात्रा आईस, व 2 मि. ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बाळास एकदाच घ्यावी लागते.) या औषधामुळे बाळंतपणाच्या वेळी बाळास होणारा एचआयव्ही संसंर्ग आपण टाळू शकतो यासाठी प्रत्येक एचआयव्ही संसर्गीत मातेने आपली प्रसृती ही इस्पितळामध्येच करणे आवश्यक आहे.
     एचआयव्ही विषाणू मातेच्या स्तनातील दुधातही असतो म्हणुन काही माता आपल्या बाळास अंगावरचे दूध न देता वरचा आहार देणे पसंत करतात. पण भारतातील नवजात बाळामध्ये एचआयव्ही मुळे होणा-या मृत्युच्या प्रमाणापेक्षा हगवण व कुपोषणामुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन बाळाला 6 महिन्यापर्यंत स्तनपानच करावे.
     बाळाला जर वरच अन्न द्यायच असेल तर AFASS चा विचार करणे गरजेचे आहे.
A - अक्सेटबल - घरच्या लोकांची वरचे अन्न देणेबाबत मान्यता असणे.
F- फिसीबल - आहार देणे प्राप्त परिस्थितीत शक्य आहे किंवा नाही हे पाहणे.
A- अफोरडेवल - लहान बाळास दर दोन तासाला पौष्टीक आहार देणे गरजेचे असते ते आपणास परवडेल का ते पाहणे.
                   
S- सस्टेनेबल - हे वरचे अन्न देणे कायमस्वरुपी देणे गरजेचे असते जर आपण अंगावरचे दूध व
             वरचे असे दोन्ही अन्न दिले तर बाळास एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
S-सेफ - हे अन्न देत असताना प्रत्येक वेळी भांडी उकळलेल्या पाण्यामध्ये धुऊन व स्वच्छता राखून हे अन्न देणे गरजेचे असते.
    वरील सर्व बाबींचा विचार करुन आपणास शक्य असेल तरच फक्त वरचे अन्न देणेस काही हरकत नाही.
   पालकांकडून अर्भकाला होणा-या एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी (PPTCT-MDR) नवीन औषधोपचार पध्दत - पालकांकडून अर्भकाला होणा-या एचआयव्हीच्या संसर्ग शुन्यापर्यंत खाली आणणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय व उद्दीष्ट आहे. सध्या एकूण एचआयव्ही संसर्गीत व्यक्ती मध्ये सर्वसाधारण 5.4 टक्के प्रमाण बालकांचे आहे. (NACO Annual Report 2009-2010) सर्वसाधारणपणे अर्भकाला एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका तीन टप्प्यामध्ये असतो त्यात गर्भधारणा होत असताना जर गरोदरमातेचा व्हायरल लोड जास्त असेल तसेच बाळंतपणाच्यावेळेस व स्तनपान करीत असेल तर एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. यात ढोबळमानाने 100 एचआयव्ही संसंर्गीत मातांपासून गर्भधारणा होत असताना 5 अर्भकाला तर बाळंतपणाच्यावेळेस 15 बाळांना तसेच स्तनपानाच्या वेळेस 10 बालकांना एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका असतो. नवीन पीपीटीसीटी कार्यक्रमाच्या माध्यमातून चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
    बाळाला होणारी एचआयव्हीचे लागण टाळण्यासाठी (PPTCT-MDR) प्रभावशाली औषध पध्दत
1 जानेवारी 2014 या दिवसापासून ही योजना महाराष्ट्रात राबविली जाणार आहे बरेच वर्षे आग्रह व पाठपुरावा केल्यानंतर आंध्र तामिळनाडू आणि कर्नाटकनंतर ही योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहे. जुन्या दिल्या जाणा-या औषध पध्दतीपेक्षा खुप प्रभावशाली अशी औषध उपचार पध्दती असल्याने या पध्दतीचा काटेकोरपणे वापर केल्यास बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग 100 बालकांपैकी दोन ते शुन्यापर्यंत आपण हे प्रमाण नेऊ शकतो. मात्र ही औषध उपचार पध्दती सर्व एआरटी सेंटर मध्ये उपलब्ध असल्याची माहिती समाजापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमावर योग्य पध्दतीने औषध देण्याची धुरा वैद्यकीय व्यवस्थेवर व आवश्यक औषध उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारी संरचनांवर आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केल्यास चालु वर्षामध्ये गर्भवती स्त्रियांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण दर हजारी 1 ते 2 एवढं आढळतं. महाराष्ट्राचा विचार केल्यास हे प्रमाण हजारात 1 ते 2 एवढं आहे. तरी राज्यात तीन हजाराहून अधिक स्त्रीया एचआयव्ही संसर्गीत आढळतात. या तीन हजारातील 40 ते 45 टक्के स्त्रिया सरकारी वैद्यकीय व्यवस्थेकडे जातात. तेवढ्याच स्त्रिया खाजगी वैद्यकीय सेवेच्या वाटेने जातात. या सर्वांचा विचार करुन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत जिल्ह्यामध्ये 54 एफ आय सीटीसी खाजगी रुग्णालयात देण्यात आल्या आहेत व एचआयव्ही संसर्गीत व्यक्तींना तालुका स्तरावर एआरटी औषधउपचार मिळावे म्हणुन जिल्ह्यात 3 एआरटी सेंटर व 5 लिंक एआरटी सुरु करण्यात आले आहेत.
       अर्ली इनफन्ट डायग्नॉसिस हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2010 पासून सुरु करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत एचआयव्ही संसर्गीत मातांना होणा-या बाळाची 6 आठवड्यापासून 18 महिन्यापर्यंतच्या बाळाची (DBS Dried Blood Spot) या पध्दतीद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये (DNAPCR) डिऑक्सी निव्योन्युक्लीक असिड पॉलिमरेज चेन रिअक्शन या टेस्‍टद्वारे बालकांची तपासणी केली जाते ही टेस्ट पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्र या ठिकाणी केली जाते. जर बाळाला एचआयव्हीचा संसर्ग असल्याचे या तपासणीत कळून आले तर जरुरी असलेले उपचार एआरटी केंद्रामार्फत सुरु केला जातो. ही तपासणी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत मोफत उपलब्ध आहे.

 - जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
 
Top