उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळ,  पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी/ मार्च 2014 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस परीक्षेस ऑनलाईन पत्र भरण्याच्या सूचनानुसार ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणा-या आवेदनपत्राच्या Upload केलेल्या प्रिंटेड प्रती Hard copy विभागीय मंडळाकडे सादर करण्याबाबत सूचित केले होते.
      परंतु तांत्रिक अडचणीमुळे इ. 12 वीच्या विद्यार्थ्याचे परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास विलंब होवू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्राच्या प्रिंटेड प्रती हार्ड कॉपी मंडळाकडे सादर करण्याच्या कार्यवाहीस तूर्तास स्थगिती  देण्यात आली आहे.
         सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन भरलेल्या आवेदनपत्रे भरलेच्या आवेदनपत्राच्या एकुण विद्यार्थ्यांची यादी व बॅंकेत जमा केलेल्या शुल्काच्या चलनाची मुळ प्रत मंडळाकडे सादर करावी. आवेदनपत्राच्या प्रिंटेड प्रतीबाबत नंतर कळविण्यात येईल. आवेदनपत्राच्या तारखा यापूवी्र कळविण्याप्रमाणेच राहतील. तेंव्हा सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.                              
 
Top