उस्मानाबाद – गुरुवार रोजी जिल्हयात विविध ठिकाणी पोलिसानी मारलेल्या छाप्प्यात 55 हजाराची अवैध दारु तर साडे सोळा हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर याप्रकरणी तेरा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलिस अधिक्षक सचिन पाटील,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक एम.डी गुंडीले यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा पोलिस दलातील पोलिस ठाणे , विशेष पथक ,गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचा-यानी केली.
सुनिल पांडुरंग चव्हाण वय 36 वर्षे रा.येडशी, सुनिल नारायण चव्हाण वय 19, अतुल रमेश राठोड वय 23,अनिल सुरेश राठोड वय 22, तिघे रा. यमाई तांडा, बार्शी व्यंकट उर्फ नितीन आण्णसाहेब कु-हाडे वय 27 रा. वेताळनगर तुळजापूर, बसप्पा नरसप्पा जमादार वय 40 रा. निलेगाव ता. तुळजापूर, गोरोबा जब्बार शेख वय 49 रा. जेवळी, यांच्याकडून देशी विदेशी दारूच्या बाटल्या व मोटारसायकल, गावठी हातभट्टी दारू, असे मिळून एकूण 55 हजार 375 रूपये किमतीचा ऐवज जप्त केले. त्याचबरोबर विलास लक्ष्मण गाढवे वय 62 वर्षे रा. अणदूर ता. तुळजापूर, विभीषण पांडूरंग कवडे रा. वाशी, गोपाळ भिमराव खोबरे वय 30 वर्षे, शाहू केशव वाघमारे वय 55 वर्षे रा. वडगाव, नामदेव लक्ष्मण क्षिरसागर वय 39 रा. येडशी, तानाजी लिमराज भातलवडे वय 35 रा. शेलगाव (दि) हे अनुक्रमे नळदुर्ग(चिवरी पाटी अणदुर),वाशी(तांदुळवाडी चौकात), उस्मानाबाद(आनंद हॉटेलच्या पाठीमागे जुन्या रेल्वे लाईन जवळ येडशी) ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याण मटका नावाचा जुगार, सुरट नावाचा जुगार, तिरट नावाचा जुगार खेळत असताना या आरोपीकडुन जुगाराचे साहित्य ,मोबाईल व रोख रक्कम असे मिळुन 16 हजार 660/- रुपयेचा मुदेदमाल जप्त करुन आरोपीविरुध्द संबधित पोलिस ठाण्याते गुन्हा दाखल करण्यात आला आहे.