उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबादतर्फे २३ डिसेंबर रोजी पहिला प्रवासी दिन कार्यक्रम राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
      उस्मानाबाद येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालय, तळमजला सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. तेंव्हा प्रवाशांनी आपल्या प्रवासी वाहतूकीच्या संदर्भातील अडीअडचणी, तक्रार व सुचना असतील त्या प्रवासी दिनी मांडाव्यात, असे आवाहन उस्मानाबाद परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले आहे.                              
 
Top