उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने दि. १६ व १७ डिसेंबर रोजी अपंगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांनी कळविले आहे.
    या स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास  राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जि.प अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहूल मोटे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, राणा जगजीतसिंह पाटील, दिलीपराव देशमुख, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, बसवराज पाटील, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती सर्वश्री धनंजय सावंत, पंडीत जोकार, सविता कोरे, दगडू धावारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे आदींची उपस्थिती राहणार आहे.
    या स्पर्धेत अस्थिव्यंग, मुकबधीर, मनोविकलांग व अंध या प्रवर्गातील एकूण २६ शाळांतील ४६० एवढे स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रवर्गनिहाय व वयोगटानुसार या स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
    क्रीडा स्पर्धेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. क्रीडा संकुलावर सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते दि. १७7 रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.                                     
 
Top