बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : काटेगाव येथील ७४ वर्षीय वृध्द शेतकर्याला बार्शीत आल्यावर सीआयडी असल्याची बतावणी करुन दोन अज्ञात इसमांनी हातोहात फसवत २५ हजारांना गंडवल्याची घटना घडली आहे.
शुक्रवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील स्टेट बँकेजवळ सदरची घटना घडली आहे. सदरच्या शेतक-याने 25 हजारांची रक्कम पिशवीत ठेऊन तुळजापूर रोडवरील शेती उपयोगी साहित्याच्या दुकानात जाताना स्टेट बँकेजवळ दोन अज्ञात इसमानी सीआयडी असल्याचे सांगून तुमची पिशवी तपासून पहायची आहे, असे सांगत पिशवी हाताळली, यावेळी हातचलाखी करुन पिशवीतील रक्कम लंपास केली व यातील फसगत झालेले शतकरी गाढवे हे गावी परत जाण्यासाठी बसस्थानक आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. सदर घटनेनंतर गाढवे यांनी बार्शी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.