सोलापूर -: जिल्हा नियोजन समितीची बेठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन 2014-15 करीता सर्वसाधारण योजनेच्या 252.39 कोटीच्या प्रारुप आराखडयास मंजुरी देण्यात आली.
    यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, सर्वश्री आ. गणपतराव देशमुख, लक्ष्मण ढोबळे, विजयकुमार देशमुख, बबनदादा शिंदे, सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, भारत भालके, हनुमंत डोळस, प्रणिती शिंदे, दिपक साळुंखे, महापौर अलका राठोड, जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम, जि.प. मु.का.अ तुकाराम कासार आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते.
    सन 2014-15 च्या 252.39 कोटी रुपयाच्या प्रारुप आराखडयामध्ये गाभा क्षेत्रामध्ये 167.47 कोटी रुपये तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये कृषी व संलग्न सेवेसाठी 49 कोटी 1 लाख 98 हजार रुपये, ग्रामविकाससाठी 23 कोटी 70 लाख 49 हजार रुपये, सामाजिक व सामुहीक सेवा 94 कोटी 82 लाख 13 हजार रुपये आदी प्रमाणे तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच बिगरगाभा क्षेत्रामध्ये 72 कोटी रुपये तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये  पाटबंधारे व पुरनियंत्रण 17 कोटी 48 लाख 46 हजार रुपये, उर्जा विकास 5 कोटी 15 लाख रुपये, उद्योग व खाण 1 कोटी 74 लाख 21 हजार रुपये, सामान्य आर्थिक सेवा 8 कोटी रुपये आदी प्रमाणे तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे.
     तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2014-15 करीता 101.68 कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना अंतर्गत 3 कोटी 91 लाख 65 हजार रुपयाच्या प्रारुप आराखडयास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
       या बैठकीत सन 2013-14 च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्हयाचा 52 टक्के खर्च करण्यात आला आहे. डिपीडीसी खर्चामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले व याबाबत संबधित अधिका-यांचे अभिनंदन केले.
तसेच यावेळी सन 2013-14 च्या पुनर्विनियोजनाबाबतचा आढावा घेण्यात आला. याबाबतचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांना देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
      यावेळी केंद्रपुरस्कृत एकात्मिक मका खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांनी गोदामे उपलब्ध करुन देण्याचे सुचित केले. महानगरपालिका क्षेत्राकरीता जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्धीबाबत‍निर्णय घेण्यात येईल. तसेच दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेला प्राधान्यक्रम देण्याबाबत सुचना दिल्या.
    याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, विरोधी पक्षनेते संजय पाटील, मनपा गटनेते महेश कोठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे यांनी केले.
 
Top