कळंब (बालाजी जाधव)  : शहरातील वेशा व्यवसाय चालत असलेल्या राजसाब लॉजवर पोलीसांनी छापा मारुन लॉज मालकासह दोघांना अटक केली असून पिट्टा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील लॉज मालकामध्ये खळबळ उडाली आहे.
    कळंब शहरातील येरमाळ रोडवर असलेल्या राजासाब लॉजवर वेशा व्यावसाय चालत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी या लॉजवर छापा टाकला. यावेळी महीला समितीच्या सदस्या ज्योती सपाटे व शोभा ठाकुर याही उपस्थित होत्या.
    सदरील राजासाब लॉजवर पोलीसांनी छापा मारल्यानंतर तेथील रुम नं. १ मध्ये अशोक रामभाऊ हरहरकर (वय-२४) रा. मुरुड हा एका अल्पवयीन मुलीसोबत अक्षेपार्ह आवस्थेत आढळुन आला. पैसे घेवून महीलांना अनैतीक व्यवसाय करण्यासाठी लॉज वापरण्यास देणे, मुलीला घेवून येणे, अनैतिक व्यावसाय करणे या कारणावरुन लॉजचे मालक बक्सार उर्फ राजु रियासतअली सय्यद, लॉज मॅनेजर रघुनाथ नारायण भांडे, वेटर शेख सुफीयान कय्याम व लॉज मध्ये अक्षेपार्ह आवस्थत आढळलेला अशोक रामभाऊ हरहरकर यांना अटक करण्यात आली असुन या चौघांवर कळंब पोलीस ठाण्यात गुरनं. ८१/२०१३ भादवी कलम ३, ४, ५, ६, ७ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ प्रमाणे सपोनि. आर.बी खारडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे हे करीत आहेत. या गुन्ह्यामधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
 
Top