
हरिभाऊ बाबूराव पवार (वय ४८, रा. येडशी, जि. धाराशिव) असे मयताचे नाव आहे. शनिवारी दि. ७ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान सदरच्या मृत्यूची खबर पांगरी पोलिसांना मिळाल्यानंतर सदरचा प्रकार पोलिसांना समजला. सदरच्या थिएटरच्या चालक मंगल देशमुख यांनी सदरच्या घटनेची प्राथमिक माहिती पोलिसांना कळविली. यातील मयत पवार हे तेथील पत्र्याच्या खोलीला असलेल्या आडूला इलेक्ट्रीक वायरला लटकल्याचे दिसून येत होते. सदरच्या खबरीनंतर पांगरी पोलिसांनी मयताचा पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेतले. बार्शीपासून केवळ तीन किलोमीटर अंतर हे पांगरीपेक्षा अत्यंत कमी अंतर असतांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेताचे शवविच्छेदनासाठी दाखल करण्याऐवजी पांगरी पोलिसांनी पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास प्रेत हलविले. यावरुन सदरच्या बाबत पोलिसांविरुध्द संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या घटनेचा तपास पांगरी येथील पो.हे.कॉं. भापकर हे करीत आहेत.