पांगरी (गणेश गोडसे) :- ज्या स्वातंत्र्य सेनानींनी देशाच्या जडणघडणीसाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश स्वतंत्र करून जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी आजच्या युवा वर्गाची असुन ती जबाबदारी आजचा तरूण समर्थपणे पार पाडु शकतो. त्यासाठी भगसिंग, राजगुरू, राणी लक्ष्मीबाई आदींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी विदयार्थांनी पुढे यावे, असे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले. ते राळेगणसिध्दी येथे त्यांच्या निवासस्थानी पांगरी (ता. बार्शी) येथील सर्वोदय विद्या मंदिर प्रशालेच्या विदयार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सर्वोदय विद्या मंदिर प्रशालेची शैक्षणिक सहल आण्णा हजारे यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर हजारे यांनी इतर महत्वाचे कार्यक्रम रद्द करून शालेय विदयार्थांशी संवाद साधला. हजारे यांनी त्यांच्या जिवनातील प्रसंग आलेले अनुभव आदी विविध विषयांना यावेळी मोकळी वाट करून दिली. हजारे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वचरित्र जपुन निश्कलंक जिवन जगुन आत्मविश्वास वाढवावा. दुस-यासाठी जगणाराच खरा जगतो, त्याचीच किर्ती पुढे रहाते. शेवटी सत्याचाच विजय होतो. आण्णा हजारे यांनी यावेळी प्रशालेच्या साठ वर्षांच्या कार्यकालाचा गौरव केला.
सहलीदरम्यान विद्यार्थांनी सिध्दटेक, राळेगणसिदधी, निघोज, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, भिमाशंकर, म़हाड, पाली, काशीद या आदी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक मुंढे, प्रतिक नारकर, तृप्ती नारकर, नाशीर पठाण, उमेश देशपांडे, गणेश राउत आदीजण उपस्थित होते.