उस्मानाबाद -: राष्ट्रीय कृषि पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2013-14 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यापुर्वी पिक विम्याचा हप्ता भरणे आवश्यक आहे. पिक विमा ही योजना सर्व पिकांसाठी एैच्छिक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाव्दारे बॅंकेत भरुन या योजनेचा  जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक,कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
    ज्या शेतक-यांना पिकाचा विमा उतरावयाचा आहे. त्यासाठी पिक शेतात पेरल्याबदल तलाठयाचा पिक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उता-यासह नजिकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेत अतिअल्प वअल्प भुधारकांना विमा हत्याच्या 10 टक्के सुट असून त्यांन विमा हप्त्यावरील दराच्या 90 टक्के प्रमाणे भरणा करावयाची आहे. अधिक माहितीसाठी शेतक-यांनी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top