सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित / विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळेतील अनु.जाती/ विजाभज व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती / गुणवत्ता शिष्यवृत्ती / परिक्षा फी तसेच अपंग शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2013 अखेर वाढविण्यात आली आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यात यावे असे आवाहन दीपक घाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
