बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील ज्येष्ठ विधीज्ञ कै.गंगाधर सोपल स्‍मृती राज्यस्तरीय विधी सेवा पुरस्कारासाठी तीन विधीज्ञांची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजक अॅड्. विकास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
     यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे दि. २५ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी अॅड्.सतीश तळेकर (औरंगाबाद), अॅड्. गिरीधरसिंह रजपूत (सोलापूर), अॅड्. असिम सरोदे (पुणे) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड्. बी.एन.चव्हाण, अॅड्. गणपत साखरे, अॅड.दिनेश देशमुख, अॅड्. अविनाश गायकवाड, अॅड्. नितीन सोडळ, अॅड. प्रदिप बोचरे, अॅड्. पद्माकर काटमोरे हे प्रयत्न करीत आहेत.
 
Top