बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- जागतिक अपंग दिनानिमित्‍त सोलापूर येथे पार पडलेल्‍या अपंग‍ क्रिडा व सांस्‍कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्‍या बार्शीतील कै. कस्‍तुरबा गांधी मुकबधीर शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांना चार सुवर्ण व एक रौप्‍य पदके मिळाली आहेत.
    या शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी क्रिडा प्रकारातील लांब उडी, पन्‍नास मीटर धावणे, शंभर मीटर धावणे आदी स्‍पर्धा प्रकारासह स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट सहभाग नोंदविला आहे. छत्रपती शिवाजी रंगभवन येथे या स्‍पर्धा पार पडल्‍या. सांस्‍कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे.
    'वाजले की बारा' या गाण्‍यावर कु. राधिका कांबळे, कृष्‍णा कांबळे, महादेव भोवळ, रमेश भोवळ, राजेश कांबळे, यासीन मदारी यांसह कलाकारांनी सहभाग घेतला. क्रिडा प्रकारात रमेश भोवळ यास लांब उडीमध्‍ये प्रथम, छोट्या गटात कृष्‍णा कांबळे प्रथम तर महादेव भोवळ द्वीतीय, पन्‍नास मीटर धावणे लहान गटात रमेश भोवळ प्रथम, शंभर मीटर धावणे स्‍पर्धेत कृष्‍णा कांबळे प्रथम असे यशस्‍वी विद्यार्थ्‍यांची नावे आहेत. या स्‍पर्धा प्रकारासाठी व सांस्‍कृतीक कार्यक्रमास मार्गदर्शन करणारे शिक्षक भोसले, श्रीमती नरवडे, दराडे, कांबळे, भंडारे यांच्‍यासह विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन मुख्‍याध्‍यापक सांवत व संस्‍थेचे अध्‍यक्ष तसेच बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण बारबोले यांनी केले आहे.
 
Top