उस्मानाबाद :– विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचा नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या वतीने प्रायोगिक तत्वावर डिजीटल सिग्नेचर द्वारे प्रमाणपत्र वितरण शुभारंभ सोमवार रोजी जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काझी हसीब अहमद आबरार अहमद काझी यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी , कळंबचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह महाआनलाईन सुविधा केंद्राचे ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट मॅनेजर शिवचरण राठोड, जिल्हा समन्वयक रवीचंद्र नवघरे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी या उपक्रमाबद्दल श्री. काकडे यांचे कौतुक केले.
जवळच्या ई-सेवा केंद्रात नागरिकांची विविध प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे अर्ज कागदपत्रे तपासून स्वीकारली जातात. त्यानंतर ती तहसील कार्यालयात अॅानलाईन पाठविली जातील. तहसील कार्यालयात पडताळणी केल्यानंतर सदरचे प्रमाणपत्र डिजीटल सिग्नेचरद्वारे प्रमाणित केले जाईल व ते संबंधित ई-सुविधा केंद्र चालकाच्या ई-मेलवर पाठविले जाईल. त्याचा एसएमएस संबंधित अर्जधारकालाही जाईल. यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा व प्रमाणपत्र मिळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे कमी होण्यास मदत होणार आहे.
या सुविधेनुसार ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दगड खाणपट्टा परवाना, जन्मदाखला, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र पत दाखला, मिळकतीचे प्रमाणपत्र, वय-राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, गौण खनिज पवाना, वारसा प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, स्टोन क्रशर परवाना, 8-अ उतारा, वीज देयक, सात-बाराचा उतारा, मृत्यूचा दाखला, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र आदी प्रमाणपत्रांसाठीही आता डिजीटल सिग्नेचरचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार काकडे व श्री. राठोड यांनी दिली.