बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महिसगांव (ता. बार्शी) येथील वीज वितरण कंपनीकडून बसविलेले विद्युत रोहित्र एका महिन्यात तीन वेळा बसविण्यात आले आहेत तरीही वीज पुरवठा बंदच असल्याची तक्रार तेथील शेतकर्यांनी केली आहे.
सदरचे दुरुस्ती केलेले रोहित्र बसवूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील शेतकर्यांनी सदरच्या कामात खोट्या प्रकारची कामे करुन शेतकर्यांची व कंपनीची फसवणूक केली जात असल्याची शंका व्यक्त केली. सदरच्या ठिकाणी केले जाणारे काम निकृष्ठ असून अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक शेतकर्यांना त्रास देत आहेत. या अगोदर वीज बिले भरा असे सांगण्यात येत होते परंतु आता वीज बिले भरुन घेतल्यानंतरही महिनाभरापासून काम केल्याचे भासविण्यात येते व अडवणूक केली जाते. सदरच्या प्रकारामुळे शेतकर्यांची हातात आलेली पिके जळून चालली आहेत व होणार्या नुकसानीस महावितरणचे कर्मचारी व अधिकारीच जबाबदार आहेत. याबाबत आपण निवेदने दिली विनंत्या केल्या परंतु त्याचा काहीच उपयोग न झाल्याने ताबडतोब दुरुस्ती न केल्यास अधिकार्यांना कार्यालयाच्या बाहेर पडू देणार नाही असा इशाराही सदरच्या शेतकर्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटना माढाचे उपाध्यक्ष डी.पी.चौधरी, संदिपान चौधरी, हरिभाऊ यादव, सुभाष खाडरे, सुभाष सुरवसे आदी शेतकरी उपस्थित होते.