बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील वीज वितरणच्या जनमित्र कर्मचार्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील थकीत वसूली जमा झाली नाही, वीजगळती होत आहे यामुळे होणार्या भारनियमनाच्या कारणास जनमित्र कर्मचार्यांना जबाबदार धरुन आठ कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले.
सदरच्या निलंबनाच्या कारवाईनंतर तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने महावितरणच्या बस स्थनानकासमोरील कार्यालयासमोर जमा झाले. यावेळी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सदरच्या कर्मचार्यांवर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे निवेदन पत्र महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आले. वरिष्ठांच्या कारवाईत निलंबित झालेले तंत्रज्ञ डी.एम.पठाण, पी.टी.जाधव, एन.एन.मते, ए.बी.कोळी, एन.आर.जाधव, शेजाळ, सोनवणे आदी कर्मचार्यांवर अन्याय झाल्याची भावना यावेळी कर्मचार्यांत निर्माण झाली होती. सदरचे निलंबन रद्द न झाल्यास विभागांतर्गत असलेल्या सर्व ३३ के.व्ही. उपकेंद्रातील सर्व फिडर्स सुरक्षेच्या कारणास्तव बंद करुन सर्व यंत्रचालक कर्मचारी कोणत्याही क्षणी आंदोलनात सहभागी होतील व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
सदरच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी एक पथक घटनास्थळी पाठवून परिस्थिती आटोक्यात आणली. सदरच्या ठिकाणी जमाव झाल्याबाबत तसेच घोषणा दिल्याबाबत पोलिसांनी कर्मचार्यांना मज्जाव करुन तंबी दिली.