
या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील आठ संघांनी सहभाग नोंदविला. बाद पध्दतीने या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर अकलूजच्या संघाने यशस्वी कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. बार्शीतील सुलाखे इंग्लिश स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर वखारिया विद्यालय, उपळेदुमाला या संघास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेची पारितोषिके स्नेअस फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर गाढवे, पोलिस उपनिरीक्षक भोस, दत्तात्रय जाधवर, प्रशिक्षक ङ्खुलचंद जावळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी बप्पा सुतार, तात्यासाहेब ङ्कस्के, हाके सर यांनी विशेष प्रयत्न केले.