उस्मानाबाद -: जैन धर्माचे जगाला अहिंसा व शाकाहाराचा महान संदेश दिला. जैन मुनी हे चालते-बोलते त्यागाचे प्रतिक आहेत. त्यांना कोणाबद्दलही मोह व क्रोध नसतो. त्यामुळे जैन महाराजांचा त्याग हा सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.के.एम नागरगोजे यांनी केले.
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र कुंथलगिरी संचलित श्री देशभुषण कुलभूषण ब्रम्ह्मचार्यश्रमाचा शताब्दी महोत्सव व महामस्तभिसेकास त्यांनी सदिच्छा भेट देवून पाहणी केली यावेळी प.पू 108 मुनींश्री चंद्रप्रभुसागरची महाराज व प. पू 108 मुनींश्री सुधर्मासागरची महाराज, संस्थेचे सचिव वालचंद संघवी, उपाध्यक्ष सुभाष गांधी, परममेष्ठी गांधी, संजय संघवी, रणजित दुरूगकर, यांची प्रमुख उपस्थिती होते.
पूढे बोलताना जिल्हाधिकारी नागरगोजे म्हणाले की, आज देशाला गुरूकूल प्रणालीची गरज आहे. सर्वत्य पश्चात्य संस्कृतीचा बोलबाला वाढत असताना कुंथलगिरी येथे देशभूषण कुलभूषण ब्रम्ह्मचार्यश्रमाच्या माध्यमातून सुसंस्कारित पिढीघविण्यांचे महान कार्य केले जाते. हे कार्य गेल्या शंभर वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. हे विशेष.
जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी कुंथलगिरी जैन सिध्दक्षेत्राची संपूर्ण पाहणी करून विकासाच्या दृष्टीने ट्रस्टीना मौलीक सुचना देखिल केल्या. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार कुंथलगिरी जैन सिध्दक्षेत्राचा विकास करण्यांची ग्वाहीही संस्थेच्या ट्रस्टीनी दिली. याप्रसंगी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या यथोचित सत्कार देखिल करण्यात आला. यावेळी संस्थेचे ट्रस्ट कर्मचारी, जैन श्रावक - श्राविका उपस्थित होत्या.