सोलापूर :-  जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विशेष घटक योजना सन 2013-14 करिता तालुकास्तरावरुन प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून पात्र/ अपात्र लाभार्थी छाननी करण्यात आल्यानंतर जिल्हा निवड समिती जिवायो विशेष घटक योजना अनु. जाती लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे गट वाटप योजनांतर्गत लाभार्थी निवड सभा बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2013 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता शिवरत्न सभागृह, जि.प., सोलापूर येथे आयोजित केली आहे. सदर निवडीकरीता पात्र प्रस्ताव धारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top