सांगोला (जगदीश कुलकर्णी) :- श्रीधर दत्तानंद मंदिराचे जिर्णोद्धारक व निष्काम सेवाधिपती बालब्रह्मचारी योगी श्री सर्मथ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांच्‍या आदेशानुसार नाझरे (ता. सांगोला) येथील श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    मंगळवार दि. १0 डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. धोंडीराम यादव महाराज (वझरे) यांचे कीर्तन, ११ रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज लेंडवे यांचे कीर्तन, १२ रोजी ह.भ.प. शिवाजी यादव महाराज यांचे कीर्तन, १३ रोजी ह.भ.प. रामहरी खंडागळे महाराज, १४ रोजी ह.भ.प. श्रीकांत टेंभूकर महाराज तर १५ रोजी ह.भ.प. परमहंस राजयोगी उद्धव महाराज (कोळे) यांचे तर १६ रोजी सद्गुरू संजीवादास महाराज यांच्या शिष्याचे सकाळी १0 ते ११ कीर्तन व दुपारी १२ वाजता 'श्री'ची फुले पडतील.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता 'श्री'ची नाझरे गावातून मिरवणूक निघेल. महाप्रसाद, गोपूजन व सप्ताहात दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे व दि. १७ डिसेंबर रोजी कुस्त्या आयोजित केल्या आहेत तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजीवाश्रम नाझरे-वझरे येथील भक्त परिवाराने केले आहे.
 
Top