नळदुर्ग  :    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  शुक्रवार रोजी  नळदुर्ग व परिसरात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांना  अभिवादन करून अदारांजली वाहण्यात आले.
    नळदुर्ग येथील भिमनगर मध्ये  सभागृहात अजय बांगडे यांच्या हस्ते डॉ. अंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, शहराध्यक्ष बाबसाहेब बनसोडे, अॅड. अभिजीत बनसोडे, प्रफूल बनसोडे, अमोल सोनकांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी  आदरांजली वाहीली.  एस.टी बसस्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक कार्यालयात डॉ अंबेडकर यांच्या प्रतिमेस  प्रा. व्ही.टी. सुरवसे, वाहतूक नियंत्रक ज्योती दस, दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, राजेंद्र शिंदे, नगरसेवक दयानंद बनसोडे यांच्या उपस्थितीत  पुष्प हार घालून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
   वागदरी (ता. तुळजापूर) येथे रिपाइं तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, शिवाजी वाघमारे यांच्या हस्ते समाज मंदीरात डॉ. आंबेडकरांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करून बौध्द वंदना घेण्यात आली. यावेळी शालेय विदयार्थ्यांनी भाषण केले. याप्रसंगी कल्लाप्पा वाघमारे, कुंडलिक वाघमारे, ग्रामपंचायत सदस्या कविता गायकवाड, कमल धाडवे, गिताबाई झेंडारे, उज्वला वाघमारे, ठकूबाई वाघमारे, द्वारकाबाई भोरे, जिजाबाई वाघमारे हे उपस्थित होते.
   येडोळा (ता. तुळजापूर) येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.  प्रविण कांबळे, देवानंद लोंढे, राम लांढे, अर्जून लोढे, अंकूश लोंढे,  हे उपस्थित होते. लोहगाव (ता. तुळजापूर) येथे एक हजार सत्तावन मेणबत्या प्रज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहूराज लोखंडे, बाळू नागिले, प्रकाश लोखंडे, परमेश्वर लोखंडे, अश्विनी लोखंडे, मंगल गायकवाड, राम कांबळे आदी उपस्थित होते.  सिंदगाव येथे चंद्रकांत शिंदे, राजेंद्र शिंदे, अंकूश शिंदे, भरगू शिंदे, ग्रामपंचायत सदस्या निर्मला कांबळे आदीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहीली.
 
Top