तुळजापूर :- टमटमने धडक दिल्याने पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंब्यानजीक शनिवारी रात्री घडली होती. यामध्ये खंडाळा पाटीनजीक एका टमटमला उडवून नंतर अडविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस नाईक हिप्परकर यांनाही त्या टमटमने उडविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी टमटमटचालकाविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद येथील तांबरी विभागात राहणारे बालाजी नंदकुमार खानविलकर हे टमटम (एम. एच. २५/१६३६) घेवून लोहार्याकडे जात होते. तुळजापूर तालुक्यातील खंडाळा पाटीनजीक दुसर्या टमटमने (एम. एच. २५/पी. ३000) त्यांच्या टमटमला धडक दिली. ही घटना ७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर अपघातानंतर न थांबता विजयकुमार नरसिंग धुमाळ या चालकाने टमटम तसाच पुढे तुळजापूरच्या दिशेने नेला. याच रस्त्यावरील मेघमल्हार हॉटेलचे मालक बालाजी बंडगर यांची ओळख असल्याने खानविलकर यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना अपघात करुन जाणार्या टमटमची माहिती दिली. त्यावेळी पोलिस नाईक शिवाजी प्रभाकर हिप्परकर (बक्कल नंबर ११९५) व अन्य एक पोलिस त्या ठिकाणी होते. बंडगर यांनी सदर माहिती हिप्परकर यांना दिली. माहिती मिळताच हिप्परकर यांनी टमटम अडविण्यासाठी हॉटेलमधून बाहेर जात रस्ता गाठला.
काही वेळातच समोरुन येणारा सदर क्रमांकाचा टमटम अडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.मात्र त्या टमटमने न थांबता हिप्परकर यांना जोराची धडक देवून १00 फुटापर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची फिर्याद पोना दिनेश पांडूरंग आकुरवार यांनी दिली आहे. त्यावरुन चालक विजयकुमार धुमाळ याच्याविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक एम.राजकुमार हे करीत आहेत. याच प्रकरणात टमटमला धडक देवून नुकसान केल्याप्रकरणीही खानविलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुमाळ याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.