उस्मानाबाद : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे नुकतेच विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. दि. २८ रोजी महात्मा फुले स्मृतीदिन, 3 डिसेंबर रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद जयंती व जागतिक अपंग दिन, 4 डिसेंबर रोजी जागतिक एडृस दिन, 5डिसेंबर रोजी अन्न भेसळ प्रदर्शन आणि 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
        महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अधिव्याख्याता जी. व्ही. पौळ होते तर अध्यक्षस्थानी ए. के. गजधने उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी श्रीमती एस. जे. भोसले,  श्रीमती व्ही. व्ही. बनसोडे, श्रीमती जी.एस मेनकुदळे उपस्थित होत्या. विभाग प्रमुख डॉ. दयानंद जटनुरे व भोईटे रविना हिने प्रास्तविक तर आभार प्रदर्शन पुजा भोईटे हिने केले. दिनांक 3 डिसेंबर रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती व जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे श्री. भुतेकर यांच्यासह त्या शाळेतील अपंग विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेतील श्रीमती भोसले एस.जी., उस्मानी मॅडम उपस्थित होत्या.         
        दि. 4 डिसेबर रोजी जागतिक  एडृस दिन सप्ताह साजरा करण्यात आला. या  कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. दयानंद जटनूरे (अधिव्याख्याता)  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथील प्रशांत कारले व नागेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजगुरु, कवठे यांच्यासह मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्रसंचालन कु. बोंडगे  हिने केले तर आभार रविना भोईटे हिने मानले.
 
Top