उस्मानाबाद :- जिल्ह्यातील औषध दुकानदार संघटनेच्या दि. 16 ते 18 डिसेंबर रोजीच्या प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि औषध पुरवठा सुरळित व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक व इंडियन मेडीकल असोसिएशन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारितील रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा करुन ठेवण्याबाबत कळविले असल्याचेही या विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 च्या अमलबजावणीसाठी हे प्रशासन कटीबद्ध असून कायद्यातील तरतूदीप्रमाणे फार्मासिस्टच्या उपस्थितीत व देखरेखीखाली व मान्यताप्राप्त मेडीकल प्रॅक्टीशनरच्या प्रिस्क्रीप्शननुसारच औषधांची विक्री रुग्णांना करणे अत्यावश्यक आहे. सद्यस्थितीत काही औषधी विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून या कायद्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावित संपात नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्ह्यातील औषधी दुकानदारांनी सामील होऊ नये, तसेच सरकारी, निमसरकारी व खासगी दवाखान्यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने मुबलक औषधासाठा उपलब्ध करुन ठेवावा. नागरिकांनी बंद काळात औषधांचा पुरवठा होण्यास गैरसोय झाल्यास त्याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, आंबेडकर चौक, उस्मानाबाद (दूरध्वनी क्र. 02472-222606) येथे संपर्क साधावा. तसेच तक्रार नोंदवायची असल्यास औषध निरीक्षक मा. ज. निमसे यांच्याशी (भ्रमणध्वनी क्रमांक- 9423749612) संपर्क साधावा. संप काळात प्रशासनाने एक नियंत्रण कक्ष तयार केला असून तो दि. 16 ते 18 डिसेंबर या कालावधीत कार्यान्वित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.