उस्मानाबाद : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2013चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 13 व 14 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह उस्मानाबाद, भूम, उमरगा, कळंब हे उपविभाग यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास आणि अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांची यावेळी उपस्थिती राहणार असल्याचे  महसूल क्रीडा स्पर्धेचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत यांनी कळविले आहे.
    या स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हालीबाल, आदी सांघीक क्रीडा प्रकारांसह बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम व इतर मैदानी खेळ आदी खेळांचा समावेश आहे.  याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
        वैयक्तिक  व सांघिक स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या 13 डिसेंबर रोजी होणार असून अंतिम फेरी 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेकरिता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा स्पर्धा समन्वय समिती, महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना, मंडळ अधिकारी व तलाठी संघटना यांनी केले आहे.
 
Top