बार्शी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवसाय करणार्या दुकानदारांकडून शेती मालाचा कडता म्हणून प्रति क्विंटल २ किलोची कपात (कडता) केली जाते सदरचा कडता बंद करावा, असे लेखी निवेदन देवगाव (मां.) येथील किशोर मांजरे यांनी बाजार समितीच्या कार्यालयात दिले आहे.
सदरच्या निवेदनात येथील आडत दुकानात आणलेल्या शेतीमालाची विक्री करतांना झालेली कपात ही शेतकर्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. सदरच्या प्रकाराची दखल न घेतल्यास शेतकर्यांसह लाक्षणीक उपोषण करण्यात येईल असेही यामध्ये म्हटले आहे.