बार्शी : बलात्काराच्या आरोपातील आरोपी असलेल्या चारही जणांना अतिरिक्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश सौ. के.एस. होरे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती अॅड. महेश जगताप यांनी दिली.
    यामध्ये भागवत कोंढारे, सीताबाई कोंढारे, रागीनी कोंढारे, सोमनाथ कोंढारे यांचा समावेश आहे. चिखर्डे येथील १९ वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून जून ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत तुळजापूर, अक्कलकोट आदी ठिकाणी वारंवार दुष्कर्म केल्याचे म्हटले आहे. पांगरी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद झाला होता. यातील दत्तात्रय कोंढारे यास पोलिसांनी अटक केली होती. आरोपीतर्फे अॅड्. महेश जगताप, अॅड्. अविनाश गायकवाड तर सरकारतर्फे अॅड्.क्यातम यांनी काम पाहिले.
 
Top