बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शारिरीक अपंग असलेल्या मुलांची बुध्दी चांगली असल्याने योग्य त्या वयात शिक्षण आणि ज्ञान मिळाल्यास अपेक्षित यश मिळते. यामुळे मुले सक्षम बनून आत्‍मविश्वासाच्या बळावर अपंगात्वर मात करु शकतात, असे मत नवोदय आदर्श ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष शरद उकिरडे यांनी व्यक्त केले.
    जागतिक अपंग दिनानिमित्त संस्थेच्या अस्थिव्यंग निवासी शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक किरण मुळे, दिपक मुठाळ, गोरख यादव, आनंद खंडेलवाल, गणेश भोळे, संजय बारबोले यांच्या सहशिक्षक व विद्यार्थी ङ्कोठ्यासंख्येने उपस्थित होते.
    यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पवार यांनी तर आभार किरण मुळे यांनी मानले.
 
Top