बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : के. एल. ई सोसायटी बेळगांव यांच्या वतीने ९८ व्या संस्थापनादिनानिमित्त बार्शी शाखेच्या सहशिक्षिका वर्षा रसाळ यांना विशेष शिक्षक सेवा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.
    डॉ. बी.एस जिरगे सभागृह, बेळगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. चेअरमन खा. प्रभाकर कोरे, अध्यक्ष शिवानंद कौजलगी, सचिव डॉ. बी. जी देसाई, लाईफ मेंबर बोर्डाचे चेअरमन डॉ. एफ.डी दिक्षीत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ. वर्षा रसाळ यांनी मागील २० वर्षातील केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. संस्थेचा अशा प्रकारचा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्रातील संस्थेच्या कर्मचार्‍यांस मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. सौ. रसाळ यांना देण्यात आलेल्या पुरस्कारानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, स्थानिक नियामक मंडळाच्या चेअरमन श्रीमती प्रभाताई झाडबुके, संचालिका सौ.वर्षा ठोंबरे, एन.सी.सी ९ महाराष्ट्राचे कमांडिंग ऑफीसर अंबरीश धुलिया, मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, शिक्षक, विद्यार्थ्यानी, अभिनंदन केले.
 
Top