बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍यावतीने जागतिक एडस दिनानिमित्‍त बार्शीतील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्‍या श्रीमान रामभाई शाह रक्‍तपेढीचा आरोग्‍यमंत्री ना. सुरेश शेट्टी यांच्‍या हस्‍ते मुंबईत गौरव केला.
    मुंबईतील यशवंतराव चव्‍हाण सेंटर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ना. सुरेश शेट्टी यांच्‍या हस्‍ते अजित कुंकुलोळ यांनी संस्‍थेच्‍यावतीने सत्‍कार स्विकारला. सुजाता सौनिक, राज्‍य एडस् नियंत्रण संस्‍थेचे प्रकल्‍प संचालक डॉ. के.एच. गोविंदराज, सचिव निता राजीव लोचन, डॉ. सतीश पवार, मुंबई महानगरपालिकेचे आरोग्‍य अधिकारी डॉ. अरुण बामणे, उपसंचालक आरोग्‍य सेवा डॉ. मोहन जाधव, डॉ. शोमना रजपूत, माहिती सहसंचालक विलास देशपांडे आदीजण उपस्थित होते.

 
Top