बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीसंदर्भात शिवसेनेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात विविध भागातील पक्षप्रमुख व पदाधिकार्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदार संघाचे पदाधिकारी, इच्छुक यांनीही मुंबईला भेट देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती शिवसेना बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र मिरगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, अडॅ लिलाधर डाके, उपनेते विश्वनाथ नेरूरकर उपस्थित होते. बार्शीहून तसेच धाराशिव मतदार संघातील शिष्टमंडळात धाराशिव जिल्हा प्रमुख प्रा. रविंद्र गाकवाड, सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर, भूम-परांडाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, औसाचे माजी आमदार दिनकर माने, भाउसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, बार्शी शहर प्रमुख दिपक आंधळकर, तालुका प्रमुख काका गायकवाड, उपतालुका प्रमुख बाळासाहेब पवार, तालुका महिला संघटक सौ. मंगल पाटील, शहर संघटक मनीषा नान्नजकर, विभागप्रमुख डॉ. लाडे, धीरज पाटील, मालोजीराजे देशमुख, सुशांत गायकवाड, टिंकू गव्हाणे, दत्तात्रय जाधव, सूरज गव्हाणे, पंडीत मिरगणे आदीजण उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकित पक्षाची धोरणे, करावयाची कामे, सद्यस्थिती, मतदारसंघातील अडचणी, करावयाच्या उपाययोजना यांची चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्षाला धाराशिव मतदारसंघात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बार्शीहून भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने दिली. यावेळी पक्षप्रङ्कुख उध्दव ठाकरे यांनी बोलतांना सर्व शिवसैनिक व पदाधिकार्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. पक्षाची पुढील धोरणे निश्चित होत असून लवकरच पुढील दिशा देण्यात येईल तोपर्यंत पक्ष नेतृत्वांनी सूचना करुन आपल्या कार्यालयाला कळविल्यात येईल त्याप्रमाणे आपल्या मतदारसंघातील अडचणी दूर कराव्यात. शिवसेना प्रमुखांचे शिवशाहीचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. यावेळी उमेदवारीबाबतही चर्चा करण्यात आली. योग्य वेळ आल्यानंतर नावे जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.