सोलापूर :  दि. 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    सदर कार्यक्रमात सहायक सरकारी वकील सौ. शैलजा क्याथम यांनी मानवी हक्क काय आहेत, मानवी हक्क आयोगाकडे कशा प्रकारे दाद मागता येते, आदिबाबत माहिती देवून मानवी हक्काबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी मानवी हक्काबबात माहिती दिली. विशेष करुन मुलींनी अत्याचाराबाबत वेळीच आवाज उठविल्यास पुढे होणा-या परिणामास जरब बसेल असे सांगितले.
    यावेळी विविध विभागाचे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बाल सुधारगृह व ममता बालगृह सोलापूर येथील मुले,मुली उपस्थित होते.
 
Top